उपसरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना झालेल्या मारहाणीत उपसरपंचाच्या मुलाचा उपचारादम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सेलू (जि .परभणी) पोलीस ठाण्यात विविध कलमांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ब्राह्मणगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही घटना घडली. निखिल रमेश कांबळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी उपसरपंच शशीकलाबाई रमेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. उपसंरपचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून आरोपींनी साथीदारांसह जातीवाचक शिवीगाळ केली. पती, लहान मुलगा स्वप्नील यास लाथाबुक्याने मारहाण केली व मोठा मुलगा निखिल याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला रॉड व दगडाने डोक्यात मारले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने निखिल उपचारादरम्यान मरण पावला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व रा. ब्राह्मणगाव ता. सेलू) यांच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ तपास करत आहेत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने ब्राह्मणगावात पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी रविवारी रात्री उशिरा भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…