शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे यांना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यापासून दराडे यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी बोलावले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान यापूर्वी त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे याला अटक करण्यात आली आहे. दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात संगनमत करून फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी असलेल्या पोपट सुखदेव सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. आपल्या नात्यातल्या महिलेला शिक्षकाची नोकरी पाहिजे म्हणून सूर्यवंशी यांनी जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे यांची भेट घेतली. यावेळी दादासाहेब दराडे यांनी आपली बहिण शिक्षण विभागात अधिकारी असल्याचं सांगितलं. तुमच्या नात्यातल्या 2 महिलांना शिक्षक म्हणून नोकरी लावतो, असं आमिष दाखवत दादासाहेब दराडे यांनी 27 लाख रुपये घेतले, पण अनेक महिने उलटल्यानंतरही नातेवाईकांना नोकरी लागत नसल्यामुळे सूर्यवंशी यांनी याबाबत दराडेंकडे विचारणा केली. तसंच पैसे परत मिळवण्याची मागणी केली, पण दराडेंनी पैसे परत दिले नाहीत. पैसे परत मिळत नसल्यामुळे सूर्यवंशी यांनी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर हडपसर पोलिसांनी दादासाहेब दराडे यांना आधीच अटक केली, त्यानंतर आता दादासाहेब दराडेंची बहिण आणि शिक्षण अधिकारी शैलेजा रामचंद्र दराडे यांना अटक केली आहे.
पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख…
गुढीपाडवा व नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आयोजित केलेल्या सुशील कुलकर्णी व सहकारी प्रस्तुत…
प्रथम क्रमांकाने भारतात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंढरपूर सह जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख…
डॉ. मिलिंद परिचारक यांची प्रमुख उपस्थिती श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे…