कर्जत तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोन्ही चिमुकल्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आरोपी बाप बचावला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
अनेक आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अळसुंदा येथे ही घटना घडली.
रविवारी दुपारी पती-पत्नीचा वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलांना विहिरीमध्ये ढकलून दिलं. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये बाप वाचला, तर दोन्ही निष्पाप चिमुकले दगावले.
कोणतीही चूक नसताना या चिमुकल्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. ऋतुजा गोकुळ क्षीरसागर (वय ८ वर्ष) आणि वेदांत गोकुळ क्षीरसागर (वय ४ वर्ष) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…