मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिक ढाकरगे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढायचे असल्याने ३३ वर्षीय विवाहित महिला माणिक ढाकरगे यांना भेटली होती. याचाच फायदा घेत आरोपी माणिक ढाकरगे याने शनिवार ५ ऑगस्ट रोजी महिलेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये तुझ्या मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो असे सांगून बोलवले. यावेळी आरोपीने महिलेचे अश्लील फोटो काढून हे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी विवाहितेला दिली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेवर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर घाबरलेल्या महिलेने रविवार ६ ऑगस्ट रोजी नानलपेठ पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी माणिक ढाकरगे याच्या विरोधात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच नानलपेठ पोलीस पोलीस निरीक्षक पितांबर कामठेवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे हे करत आहेत. या घटनेतील आरोपी माणिक ढाकरगे हा सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आरोपीला लवकरच ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…