दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातल्याने तीन मेहुण्यांनी मिळून पतीची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतक शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहत आहे. मुमताज हिचा आधी निकाह झाला असून पहिल्या पतीपासून तिला तीन मुले आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती होता. शेहबाजपासून मुमताजला दोन मुले झाली आहेत. हीच दोन मुले घेऊन जाण्यासाठी मृतक शेहबाज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुमताजच्या घरी आला; मात्र, मुले घेऊन जाण्यास मुमताजने विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून शेहबाजला बेदम मारहाण करत हातोडीने प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
यानंतर तिन्ही मेहुण्यांनी शेहबाजचा मृतदेह घराबाहेर खेचत आणत रिक्षात टाकला आणि नदीत फेकून दिला. विशेष म्हणजे, तीन मेहुण्यांमध्ये हेमंत बिचवाडे हा मुमताजच्या आई-वडिलांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समोर आले. दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला. सायंकाळच्या सुमारास तीन मेहुण्यांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीत शेहबाजचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह रिक्षातून नेऊन नदीत फेकल्याचे पोलिसांनी कळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात असलेल्या तीन मेहुण्याकडे चौकशी केली असता या तिघांनी शेहबाज शेख याला मारहाण केल्याची कबुली दिली. शेहबाजचा मृतदेह हा कल्याण मुरबाड रोडवरील पांजरपोळ नजीक नदीत फेकल्याचे सांगितले. खडकपाडा पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शेहबाजचा नदी पात्रात आज सकाळपासून शोध घेत आहेत; मात्र जवळपास आता २४ तास उलटून गेले. दुसरीकडे शेहबाजच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागला नसून नदी पात्रात शोधकार्य सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…