Categories: Uncategorized

प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. ०८ ते दि.१० ऑगष्ट दरम्यान

पंढरपूरः ‘शै.वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीचा विचार केला असता नेहमीप्रमाणे या ही वर्षी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला  विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थांची वाढती संख्या, शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण, मिळालेली मानांकने, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसत आहे. एकूणच ‘स्वेरीत प्रवेश मिळणे ही काळाची गरज असल्याचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी पूर्णपणे ओळखले आहे हेच दिसून येते.’ असे प्रतिपादन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले.
        स्वेरीत पहिल्या कॅप राऊंड नंतर फारशा जागा शिल्लक राहत नाहीत हा इतिहास आहे. याच पार्श्वभूमीवर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. ‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवार, दि.०८ पासून ते गुरुवार, दि.१० ऑगस्ट  २०२३ हे तीन दिवस चालणार आहे. या तिसऱ्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर शनिवार, दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांना पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी पहिल्या फेरीत व दुसऱ्या फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केले आहे त्यांना या तिसऱ्या व अंतिम फेरीचा लाभ घेता येणार आहे.’ अशी माहीती अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी दिली. सन २०२३-२४च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रियानंतर पहिल्या व दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील दोन्ही फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आता ही शेवटची संधी आहे. त्यामुळे योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी मागे झालेल्या चूका टाळून व कट ऑफ चा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-३ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, कॅम्पस मधून मिळणारे संस्कार, शैक्षणिक वातावरण, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) शनिवार, दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन रविवार, दि.१३ ऑगस्ट ते बुधवार, दि.१६ ऑगस्ट  २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागेल. स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक-६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सोय केली असून प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वेरी महाविद्यालय सज्ज आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago