ताज्याघडामोडी

घरातले गाढ झोपलेले, तो रात्रभर चकरा मारत राहिला, मग पहाटे त्याने…

मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने रविवारी पहाटे स्वतःला चाकू मारुन संपविलं. पत्नीने धाव घेतली असता ती सुद्धा जखमी झाली आहे. घरातील सर्वांनी धाव घेऊन मानसिक रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ही धक्कादायक घटना बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीतील निंभोरा येथे ६ ऑगस्ट रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मानसिक आजाराने त्रस्त असल्याने मृतक उपचार घेण्यासाठी वर्धा येथून अमरावती शहरात त्याच्या बहिणीकडे आला होता.

मानसिक आजाराने त्रस्त असल्याने देवळी वर्धा येथे राहणारा ३६ वर्षीय भूषण रमेश भगत उपचार घेण्यासाठी कुटुंबासह अमरावती शहरातील बडनेरा मार्गावरील निंभोरा येथे शनिवारी रात्री ८ वाजता आले होते. त्यांच्या सोबत त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं त्यांचे जावई सुरेश जाधव यांच्याकडे आले होते. दुसऱ्या दिवशी बहीण त्यांना दवाखान्यात उपचाराला घेऊन जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच अनर्थ घडला.

अशात घरातील सर्वजण गाढ झोपले होते. मात्र, भूषण भगत हे रात्रभर न झोपता घरात चकरा मारत होते. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या दरम्यान भूषणने घरातील सूरी हातात घेऊन त्याने गळ्यावर अचानक वार करण्यास सुरुवात केली. इतक्यात पत्नीला जग आली, पती स्वत:वर वार करत असल्याचं पाहून पत्नी धावून गेली आणि तिने त्यांच्या हातून सूरी हिसकण्याचा प्रयत्न केला असता तिला सुद्धा सूरी लागून ती जखमी झाली आहे.

आरडाओरड ऐकून घरातले सारे जागे झाले. घरातील सर्व सद्यस्य जागे झाल्यानंतर त्यांनी भूषण भगतला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बडनेरा पोलिसांनी पंचनामा करून हे प्रकरण वर्ग केले आहे. मृतक भूषण भगत याने याआधी सुद्धा स्वतःला जखमी केले होते, अशी माहिती बडनेरा पोलिसांनी दिली आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago