पत्नीने पतीची गळा आवळून त्याला संपविल्याची घटना टिटवाळ्याजवळील बल्याणी परिसरात घडली. प्रवीण मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली आहे. धक्कादायक म्हणजे पतीची संपविल्यानंतर दारूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव प्रणितीने केला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिच्या बनावाचा भांडाफोड झाला.
टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिता मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रवीणला दारूचे व्यसन होते. प्रवीण दारू पिऊन प्रणितीशी वाद घालायचा. तीन ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला. त्याने प्रणिताची वाद घालण्यास सुरुवात केली. संतापलेल्या प्रणिताने प्रवीणची गळा आवळून त्याला संपविले.
हत्येचे कृत्य लपवण्यासाठी प्रणिताने दारू प्यायल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याचे भासवले. मात्र प्रवीणच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याला गळा आवळून संपविल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितीवर संशय आला. पोलिसांनी प्रणितीला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता प्रणितीने प्रवीणला गळा आवळून संपविले याची कबुली दिली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…