बिबट्याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करून टीव्हीच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच धांदल उडाली. प्रसंगावधान राखून घरातील महिलांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच रेस्क्यू टीमने बिबट्याला ताब्यात घेतले आणि माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले. ही घटना गुरुवारी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथील रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात घडली.
गुरुवारी रात्री अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या मसळे यांच्या घरात शिरला. कोणाला काही कळायच्या आत तो टीव्हीच्या टेबलाखाली लपून बसला. दरम्यान, घरात सर्व जण झोपले होते. रात्रभर बिबट्याही तेथेच होता. सकाळी दूध काढण्यासाठी घरातील माणसे उठल्यावर त्यांना टीव्हीच्या खाली बिबट्याचे शेपूट दिसले. सुरुवातीला त्यांना साप असल्याचा भास झाला. यामुळे त्यांनी काठीने शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर बिबट्या दिसताच सर्वांचीच तारांबळ उडाली. घरात रामचंद्र मसळे यांची पत्नी सुगंधा, आई जिजाबाई यांनी प्रसंगावधान दाखवून घराबाहेर धाव घेतली. तोपर्यंत ही खबर गावभर पसरली. नागरिकांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली.
यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्या घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. तो पावसात भिजल्याने व त्याला काही ठिकाणी जखमी झाल्याने तो आजारी होता; तसेच घाबरल्यामुळे तो लवकर घरातून बाहेर निघत नव्हता. यामुळे वन विभागाने त्याला पकडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन बेशुद्ध केले. यानंतर पाच ते सहा वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या ताब्यात घेण्यात आला. या वेळी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, माणिकडोह बिबट निवारा केद्रांचे चंदण सवाने, महेंद्र ढोरे, वनपाल प्रवीण लांघी आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…