पंढरपूर: प्रतिनिधी
“सँकी सोल्युशन्स” हि कंपनी जगातील तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी डिझाईन, अनुप्रयोग विकास, डेटा सेवा, ऑटोमेशन, टेक असेसमेटं आदी क्षेत्रात कार्यरत असलेली “सँकी सोल्युशन्स” कंपनीकडून पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पस ड्राईव्ह मधुन २ विद्यार्थिनीची निवड झाली असल्याची माहिती काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये “सँकी सोल्युशन्स” कंपनीकडून कॅम्पस मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले चिकमहुद (ता. सांगोला) येथील कुमारी प्रियांका राजु कांबळे आणि कामती (बुद्रुक) ता. मोहोळ येथील कुमारी सोनम नानासाहेब अंकुशराव या दोन विद्यार्थिनींची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन कंपनीकडून ४ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
“सँकी सोल्युशन्स” कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा, वैयक्तिक कौशल्य ज्ञान, परीक्षेतील गुण आदीसह अनेक बाबींचा मुलाखतीमध्ये समावेश होता.
हि निवड प्रक्रिया “सँकी सोल्युशन्स” कंपनीचे एच. आर. रवी उदय यांच्या उपस्थितीत पार पडली. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे फक्त महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत नसुन जिल्हातील सर्वच अभियांत्रिकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थी व पालकांमधुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“सँकी सोल्युशन्स” कंपनीचा ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. वैभव गोडसे, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…