मुलगा आणि सुनेमध्ये सुरु असलेल्या घरगुती भांडणात मध्यस्थी करणं बापाला चांगलंच महागात पडलं आहे. वादावेळी सूनबाईला राग आल्याने ती घरातून निघून गेली. याच गोष्टीचा राग आलेल्या संतप्त झालेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लोखंडी पहार टाकून त्याचा खून केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजारझाडी जवळील साबरसोंडा गावात रात्रीच्या वेळेस प्रकाश शामराव व त्याची पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. प्रकाशचे वडील शामराव भिवसन जगताप हे त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी प्रकाशची पत्नी घरातून निघून गेली.
याच गोष्टीचा राग आल्याने प्रकाशने घरातील जुनी लोखंडी पहार उचलली व ती थेट वडिलांच्या कानावर मारली. लोखंडी पहारीचा वार वर्मी बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात शामराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, साक्री पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनी पथकासह घटनास्थळावर धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान घटनेचे गांभीर्य पहाता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आरोपीस तात्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…