ताज्याघडामोडी

आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

रत्नागिरी जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुका हादरला आहे. पत्नी व सहा वर्षांचा चिमुकल्याची हत्या पतीनेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड झाला. या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश याने पत्नी सोनाली (२६) हिची हत्या कोयत्याचे वार करून केली, तर प्रणव (६) या स्वतःच्या मुलाची हत्या गळा दाबून केली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तत्काळ फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेशने अज्ञात कारणावरून आपली पत्नी सोनालीची आणि मुलगा प्रणव यांची निर्घृण हत्या केली. चिमुकल्या प्रणवची हत्या गळा आवळून किंवा नाक तोंड दाबून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. संदेशविरुद्ध पोलीस पाटलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून या दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे.

पत्नी आणि मुलाला ठार मारून संशयित आरोपी संदेश चांदिवडे हा फरार झाला होता. त्याचा लांजा पोलीस कसून तपास करत होते. काही पोलीस पथके तपास करत असताना त्यांच्याच घरामागील एका सड्यावर लपून बसलेल्या संदेशला अखेर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago