ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ज्ञानेश्वरी गिरीबे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या ज्ञानेश्वरी काशिनाथ गरिबे हिची “इम्प्रेशन सिस्टम्स अ‍ॅण्ड इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली आहे.
“इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीची स्थापना टेक्नोक्रॅट्सनी २००५ मध्ये मटेरियल हँडलिंग सिस्टमच्या ऑटोमेशनच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. ऑटोमेशन हे उत्पादन उद्योगाचे भविष्य आणि गरज आहे. कुशल कर्मचार्‍यांची सतत वाढणारी किंमत, ग्राहकांकडून वाढलेली मागणी, उच्च पुनरावृत्ती उत्पादन अचूकतेची गरज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढत्या स्पर्धात्मक बाजार परिस्थितीमुळे उत्पादन उद्योग मनुष्यबळ-आधारित उत्पादन क्रियाकलापांच्या पारंपारिक दृष्टिकोनातून स्वयंचलित उत्पादनाच्या वापराकडे वळला आहे.
हि कंपनी हँडलिंग सिस्टीम्स आणि प्रोसेस ऑटोमेशन या क्षेत्रात उत्पादने आणि मॅन्युफॅक्चरिंग लाइन्सचा एक अग्रगण्य पुरवठादार बनण्याचे उद्दिष्ट ठेवून सतत पुढे जात आहे. कंपनीची उत्पादने खाद्य आणि पेये, ऑटोमोटिव्ह, हेवी फॅब्रिकेशन उद्योग, शिपयार्ड, बांधकाम उपकरणे, पवन आणि उर्जा, वाहतूक यंत्रे (मेट्रो आणि डिझेल लोकोमोटिव्ह सारखी) यांसारख्या क्षेत्रात अग्रेसर आहे. अशा या कंपनीत कुमारी ज्ञानेश्वरी काशिनाथ गरिबे हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ३ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
“इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी गरीबे हिचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

1 day ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago