सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी लोणेरे, रायगड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये बी. फार्मसी प्रथम सत्राच्या निकालामध्ये कुमार गाडगे मंजूनाथ बसवेश्वर एस. जी. पी. ए नुसार ८.७२% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच कुमारी मोटे काजल संपत ८.५९% मार्क्स मिळवून द्वूतीय क्रमांक मिळविला. आणि कुमारी सास्मल सोवा अमर याने ८.४५% मार्क्स मिळवून तृत्तीय क्रमांक पटकाविला. तसेच कुमारी कदम कल्याणी बालाजी हिनेसुद्धा ८.४५% मार्क्स मिळवून तृत्तीय क्रमांक पटकाविला अशी माहिती कॉलेज चे प्राचार्य डॉ. एस. के. बैस यांनी दिली आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आणि विध्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशासाठी सर्व प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांनी कठोर परिश्रम घेतले आहे.व त्यांचे व्यवस्थापन मंडळाने अभिनंदन केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा. दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे आणि टेक्निकल डायरेक्ट डॉ. बाडकर यांनी सर्व विध्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…