पंढरपूरः- ‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या कॅम्पस निवड प्रक्रियेतून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून राहुल किसन देवकते, भूषण सतिश देशमुख, राहुल किसान गपाट, वैष्णवी मोतीलाल मोरे, गीरीमल्लेश्वर बालाजी नागेल्ली, ज्ञानेश्वर संजीवन लोहार, विठ्ठल अशोक शिरसाळे, गोरक्षनाथ बाळकृष्ण शेजाळ, ओंकार अमसिद्ध बिराजदार, राहुल लक्ष्मीकांत हिंगमिरे, साहिल संतोष कुलकर्णी व तृप्ती सुनील कटकमवार या १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. ‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. अशा नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…