ताज्याघडामोडी

अल्पवयनी मुलगी बेपत्ता, नातेवाईकांना कोळशाच्या भट्टीबाहेर चप्पल अन् कडं सापडलं

राजस्थानमधील भिलवाडा येथे जंगलात कोळशाच्या भट्टीबाहेर हरवलेल्या अल्पवयीन मुलीचे ब्रेसलेट आणि चप्पल सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह कोळशाच्या भट्टीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

माहिती मिळताच अतिरिक्त एसपी, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि स्टेशन प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. भिलवाडा एसपी आदर्श सिद्धू यांनी सांगितले की, मुलीची हत्या आणि पेटवल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की, मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी सांगितले की, याप्रकरणी संशयाच्या आधारे चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

स्टेशन प्रभारी खिवराज गुर्जर यांनी सांगितले की, कोटरी भागातील नरसिंगपुरा गावातील अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी तिच्या आईसोबत शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी तिची आई घरी परतली, मात्र मुलगी घरी परतली नाही. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाईकांनी गावात तिचा शोध सुरू केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही.

अल्पवयीन मुलीचा शोध घेत असताना गावाजवळील जंगलात कुटुंबीयांना कोळशाची भट्टी जळत असल्याचं आढळून आलं. भट्टीच्या बाहेर ब्रेसलेट आणि चप्पल सापडली. कालबेलिया समाजाच्या लोकांनी येथे चार-पाच हातभट्ट्या केल्या आहेत. ते जंगलातून लाकूड तोडतात आणि या भट्ट्यांमधून कोळसा बनवतात. यामध्ये एक भट्टी सुरु होती, त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या.

अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने कुटुंबीय भट्टीजवळ पोहोचले. त्यांनी भट्टीतून लाकूड काढण्यास सुरुवात केली असता त्यांना अल्पवयीन मुलीच्या हातातले कडे, चप्पल आणि मुलीची काही हाडं आढळून आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago