“सबसे कातील, गौतमी पाटील”, असं म्हणत अवघ्या काही महिन्यातच जिने महाराष्ट्राला घायाळ केलं. त्या गौतमी पाटीलच्या बातम्या दररोज काही ना काही येत असतात. गौतमी पाटील तिच्या अदाकारीमुळे तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तरुणाई प्रचंड गर्दी करते. याचदरम्यान, अहमदनगरमध्ये तिच्या कार्यक्रमावेळी राडा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमात गौतमी पाटीलने आयोजकांना तंबी दिली आहे. नियोजन व्यवस्थित नसेल तर कार्यक्रम रद्द करणार, असा इशारा दिला आहे.
अहमदनगरच्या नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवं नागपूरचे सरपंच यांनी कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. तरुणांनी इतका गोंधळ घातला की, त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली.
दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही, तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने यावेळी दिला. “गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही,” अशी भूमिका गौतमी पाटीलने यावेळी सांगितलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…