ताज्याघडामोडी

तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात ही घटना घडली. शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.\

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात एक शेतमजुराचे कुटुंब राहत आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या कुटुंबात अडचणी येत आहे. त्यामुळे एका नातेवाईकाने त्यांची पांडे या भोंदूबाबाशी ओळख करून दिली. घरगुती अडचणी सोडविण्यासाठी हा पांडे त्यांच्या घरी येऊन मंत्रतत्र उपचार करतो. त्यामुळे त्याची कुटुंबाशी ओळख झाली आहे.

याच ओळखीचा फायदा घेत पांडे या मजुराच्या घरी आला. तेव्हा घरात महिला एकटची होती. बाकीचे शेतावर कामाला गेले होते. याचा गैरफायदा पांडे यांने उचलला. घरात एकटी असलेल्या महिलेच्या अंगावर उदीसदृष्य पदार्थ टाकून आपण उपचार करीत असल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर पांडे पळून गेला. त्यानंतर महिलेने पतीच्या मदतीने आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरूद्ध अत्याचार केल्याचा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला, आश्वीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने पथके रवना केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 week ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 week ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago