कधी, कोणावर, प्रेम होईल सांगू शकत नाही. काही लोक तर प्रेमात आंधळे होतात. प्रेमात ते एवढे आकंठ बुडतात की ते काय करत आहेत याचंही भान त्यांना नसतं. अनेकदा तरुण तरुणींमध्ये यावरुन वाद, भांडणही होतं. काही प्रकरणे हाणामारी पर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं आहे.प्रियकर तरुणानं आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बघितलं. त्यानंतर त्यानं तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणानं लाथा-मुक्क्यांनी तरुणीला मारहाण केली. तरुणी सोडण्यासाठी गयावया करताना दिसली. तरुणीकडून सोडण्याची विनंती करण्यात आली मात्र तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरुच होती.
तरुणी लोक बघत आहेत मारु नको ओरडत राहिली मात्र तरुणानं तिचं काही एक ऐकलं नाही. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. छत्रपती संभाजीनगरमधील हे प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथे भांडण झाल्याचं समोर आलं आहे.दरम्यान, प्रेम, भांडण, अफेअर, अशा अनेक घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. अनेकदा मारहाणीचेही व्हिडीओ समोर येतात. कधी तरुण तरुणीला मारतात तर काही प्रकरणात तरुणी तरुणाला बेदम मारहाण करते. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…