पंढरपूर –
आषाढी वारीत व पावसाळा सुरू होताना अचानक घाई गडबडीत टेंडर काढून पंढरपूर नगरपरिषदेेच्यावतीने पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते दुरूस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम केले ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाच्या सुरूवातीलाच सर्वत्र रस्ते पुन्हा खड्डेमय झालेले आहेत.रस्ते दुरूस्ती केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांवर टाकलेला भराव वाहून गेलेला आहे व परत खड्डे जैसे थे झाले आहेत त्यामुळे या सर्व कामाची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ती रस्त्याची काम पुन्हा दुरूस्त करून घेण्यात यावीत तसेच ठेकेदारांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर पंढरपूर शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी यांच्यावतीने तीव्र आंदोलन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी पंढरपूरचे तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, युवक प्रदेश महासचिव शंकर सुरवसे, कॉंग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, जिल्हा सरचिटणीस राजू उराडे, जि.अ.ग्राहक सेल संग्राम जाधव, किसान कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, सतीश आप्पा शिंदे, पंढरपूर अल्पसंख्यांक सेलचे अशपाक सय्यद, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर, युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे, सागर कदम, दत्तात्रय बडवे, शशिकांत चंदनशिवे, नागनाथ अधटराव,मिलिंद अढवळकर, सुदर्शन खंदारे, पांडुरंग इरकल,शिवकुमार भावलेकर आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी म्हणाले की, पंढरपूर शहरासाठी तिर्थक्षेत्र असल्यामुळे कोट्यावधी रूपयांचा निधी मिळत आहे मात्र त्या आलेल्या पैशातून चांगली कामे होत नसल्यामुळे आलेला निधी वाया जात असून केवळ ठेकेदार जगविण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे त्यामुळे अशा ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पंढरपूर शहरात चांगल्या दर्जाची विकासकामे करण्यात यावी अशी मागणी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…