नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकापर (लोढा) गावात रविवारी रात्री सख्ख्या भावाने आणि जावयाने मिळून एका तरुणाला संपवून टाकले. देवलापार पोलिसांनी तीन तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
नरेश जयसिंग वरठी (३०) असे मृताचे नाव असून महेश जयसिंग वरठी (२७) आणि जावई संजय श्रीराम इनवाते (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही पिंडकापर (लोढा, जिल्हा रामटेक) येथील रहिवासी आहेत. मृतक नरेश जयसिंग याचा दारूच्या नशेत बहिण कविता ईनवाते हिच्याशी नेहमीच वाद होत होता. दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृतक नरेश हा मद्यधुंद अवस्थेत बहिणीच्या घरी पोहोचला आणि तिला शिवीगाळ करू लागला.
दरम्यान, नरेशचा भाऊ महेश याने त्याला मारहाण केली. मृताच्या डोक्यावर पाठीमागून काठीने वार केले तसेच मृतकाचा जावई संजय इनवाटे याने हातातील धारदार शस्त्र हिसकावून नरेशवर वार केले, यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पो ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी अवस्थेतील नरेशला शासकीय ग्रामीण रुग्णालयात देवलापर येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…