ताज्याघडामोडी

दांपत्याने चुलत भावाला लोकेशन पाठवत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बोलवले; समोरचे दृश्य पाहून बसला धक्का

आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दांपत्याने आपल्या चुलत भावाला लोकेशन पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील एका शेतातील पत्र्याचे शेडमध्ये त्यांनी गळफास लावून घेतला असून गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. राहुल राजाराम परीट (वय २३) आणि अनुष्का राहुल परीट (वय-२१) असे मृत दांपत्याचे नाव आहे.

जानेवारी महिन्यातच राहुल परीट याचा अनुष्का कांबळे या तरुणीसोबत आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. या विवाहाला घरातील सदस्यांनी सुद्धा मान्यता देत स्वीकारले होते. मात्र काल अचानक त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

राहुल परीट आणि अनुष्का कांबळे या दोघांचे जानेवारी महिन्यात वाघापूर येथे आंतरजातीय प्रेमविवाह संपन्न झाला होता. या विवाहाला घरच्यांनी देखील मान्यता देत स्वीकारले होते. तर राहुल परीट हा काही दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील सावर्डे या गावात महावितरणमध्ये वायरमन म्हणून बदली झाली होती. अनुष्का ही कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. काल बुधवारी सकाळी अनुष्काला कॉलेजला सोडून कामावर जातो असे सांगत दोघेही व्हनगुत्ती येथून घराबाहेर पडले. रात्री दहा वाजता आपण कोल्हापुरातच थांबणार असल्याचे सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुलने आपल्या वडिलांना घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर तो मित्रासोबत सोशल मीडियावर चॅटिंग करत बसला दरम्यान त्याने आपल्या चुलत भावाला इस्पुर्ली येथील लोकेशन पाठवले आणि फोन बंद केला. तर बराच वेळ झाला तो घरी आला नाही, यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याला फोन लावले असता फोन पण लागला.

दरम्यान राहुलने पाठवलेल्या लोकेशनच्या आधारे हुडकत आले असता इस्पुरली येथे एका शेतात पत्र्याच्या शेड जवळ राहुलची मोटरसायकल सापडली. शेडमध्ये गेले असता दोघांनीही ओढणी आणि साडीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. राहुल आणि अनुष्काने उचललेल्या या टोकाच्या पावलाने कुटुंबाला चांगला धक्का बसला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago