ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीत निवड

महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         अॅटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधीत असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनिअरिंगच्या महेश सुनील देशमुख व ऋतुजा विनायक कापसे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. महिंद्रा अँड महिंद्रा ही १९४५ साली स्थापन झालेली कंपनी आहे. अॅटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रेसर व नामांकित कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रमशिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूडकम्युनिकेशन स्किलएडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंगमॉक इंटरव्यूवग्रुप डिस्कशनसॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरईटोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांच्यासह पालकांनी महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या महेश देशमुख व ऋतुजा कापसे यांचे अभिनंदन केले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

3 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

7 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago