ताज्याघडामोडी

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीत आरोग्य,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा येथे १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने पंढरपूर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असता आज दिनांक २७जुलै रोजी खर्डी येथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर व नेत्रदान तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला.

ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला एक नवी दिशा दिली असे पंढरपूरचे सुपुत्र श्री अभिजीत पाटील यांचा १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी उपक्रमाचे आयोजन होत आहे..

याप्रसंगी बोहाळी गावचे ज्येष्ठ उत्तम दादा जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले… यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता बागल मॅडम, नेत्र तपासणी तज्ञ डॉ.खांडेकर, पंढरपूर ब्लड बँकेचे शिवाजी कांबळे, श्रीमती कोंडे, खर्डी गावाचे अशोक महादेव पाटील, रामदास शामराव रोंगे, बापूसाहेब चिंतामणी रोंगे, ॲड.संजय रोंगे, वामन जाधव, भगवान भोसले, शंकर जाधव, लक्ष्मण डोंगरे, दिनकर रोंगे, विशाल रोंगे, पोपट पाटील, दत्तात्रय रोंगे, मनोहर जाधव, देविदास खुळे, तात्या पळसे, दत्तात्रय रणदिवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago