मंगळवार १ ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन
पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष,पंढरपूरच्या राजकीय,सामाजिक वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटवत लोकप्रिय ठरेलले लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात दिनांक २९ जुलै पासून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता मा.आ.प्रशांत परिचारक,हभप.प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते तर आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्यास मा.नगराध्यक्ष बाबासो अधटराव,सुभाष भोसले,शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव,मा.चेअरमन दिनकर मोरे,अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे,मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे,मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांच्यासह पांडुरंग परिवारातील विविध जेष्ठ नेते,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी हे प्रमुख अतिथी म्हणून या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
तर मा.नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्टी निमित्त आयोजित या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभाशीर्वाद देण्यासाठी वारकरी संप्रदायातील जेष्ठ महाराज मंडळी,फडकरी,दिंडी सोहळ्याचे प्रमुख हे उपस्थित रहाणार आहेत.
मा.नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्टी निमित्त वाढदिवस सत्कार समिती,मित्रपरिवार व विक्रम शिरसट मित्रमंडळाकडून शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी कवठेकर प्रशाला नाथ चौक, सोमवार दिनांक ३१ रोजी आपटे हायस्कुल,लोकमान्य विद्यालय,आश्रम शाळा गोविन्दपुरा येथे येथे गरजू विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
शनिवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत कवठेकर प्रशाला येथे चित्रकला स्पर्धा,रविवार दिनांक ३० रोजी सकाळी ९ वाजता अंबाबाई पटांगण व दीनदयाळ मंदिर येथे वृक्षारोपण,११ वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन,११;३० वाजता रामकृष्ण हरी वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन,सोमवार दिनांक ३१ रोजी सकाळी ९ वाजले पासून क्रांती चौक येथे सर्वरोग निदान शिबीर,मंगळवार दिनांक १ आगस्ट रोजी सकाळी १०;३० वाजता रायगड भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी यमाई तलाव बुद्ध भूमी येथे बोधिवृक्ष पूजन करण्यात येणार आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सत्कार समिती,मित्रपरिवार व विक्रम शिरसट मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.