छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी पहायला मिळाली. या मारामारीत यामध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर तलवारीने वार केले. अंगावर शहारे आणणारा हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे गट नंबर ५९ मध्ये शेत जमिनीवरून वाद झाला. शाब्दिक चकमक सुरू असताना एक तरुण थेट तलवार घेऊन आला. दरम्यान शिवीगाळ सुरू असताना एका तरुणाने दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर थेट तलवारीने हल्ला करायला सुरुवात केली. सपासप चार-पाच जणांवर तलवारीने वार केला. यामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामध्ये एकनाथ साळे तसे त्यांचे बंधू उद्धव साळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील काही आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली असून काही आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…