अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं. पुण्यात सुटीवर आलेल्या गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याला संपवून नंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचं कुटुंब बालेवाडी परिसरात वास्तव्याला होतं. सुटीवर आलेल्या गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळ्या झाडून हत्या केली. परवाना असलेल्या त्यांच्या खाजगी पिस्तुलातून त्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची माहिती घेऊन त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असावं याच कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…