छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे. सिल्लोड येथील ही घटना आहे. या घटनेनं जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तर आणखी दोघांचा शोध सुरू सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजू बाबुलाल महेर राहणार पळसी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रेणूकाबाई राजू महेर यांनी 15 जून 2023 रोजी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रार प्राप्त होताच सायबर सेलच्या मदतीनं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. राजू यांची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपींनी 4 जून 2023 रोजी राजू महेर यांची हत्या करून मृतदेह अजिंठा घाटात फेकून दिला होता. कुजलेल्या स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
प्रकरणात पोलिसांनी आरोपी गणेश महेताब महेर आणि करण नारायण बारवाल या मामा-भाच्यांना अटक केली आहे. आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…