ताज्याघडामोडी

‘कर्मयोगी’ मध्ये प्रथम वर्ष इंजिनियरिंग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी (कॅप राऊंड १) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार दि. २० जुलै २०२३ पासून सुरू होणार आहे. या फेरीमधून विद्यार्थी महाविद्यालय व पसंतीची शाखा निवडू शकणार आहेत. अभियांत्रिकी ची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठराविक दिलेल्या मुदतीमध्येच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या मध्ये विद्यार्थ्यांच्या हातून काही वेळेस चुका होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे ऑप्शन फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले.

याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. अभय उत्पात म्हणाले की प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या कॅप राऊंड साठी २० जुलै ते २२ जुलै २०२३ या तारखे मध्ये विद्यार्थ्यानी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये मोफत मार्गदर्शन व ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरावा.मोफत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात (9158325055) व प्रा. जे एल मुडेगावकर (9421090805) यांच्याशी संपर्क करावा.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

1 day ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago