ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म २० जुलै पासून सुरू

स्वेरीकडून विविध ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूरः प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे (कॅप राउंड-१) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवारदि.२० जुलै २०२३ पासून  सुरु होत असून ती शनिवार दि. २२ जुलै पर्यंत चालणार आहे. या पहिल्या कॅप राउंड मधून विद्यार्थी हवे ते महाविद्यालय आणि पसंतीची शाखा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय आणि  शाखा निवडण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील प्लेसमेंटवार्षिक परीक्षांचे  निकालप्रत्येक वर्षी होणारी विद्यार्थ्यांची प्रवेश संख्याउच्च शिक्षित प्राध्यापक वर्गवसतिगृह सुविधाइतर सोयी सुविधाइन्फ्रास्ट्रक्चरमिळालेली मानांकनेविद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारे  संशोधनाचे वातावरण या सर्व बाबी प्रामुख्याने पहाव्यात आणि मगच महाविद्यालय निवडावे. विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत महाविद्यालयांची नावे काळजीपूर्वक भरणे आवश्यक असते. पालक व विद्यार्थ्यांचा नाहक प्रवास खर्च व वेळ वाचावा तसेच विद्यार्थी व पालकांना अचूक पद्धतीने हे फॉर्म्स भरता यावेत या हेतूने स्वेरीच्या वतीने विविध ठिकाणी मोफत फॉर्म भरण्यासाठी सेंटर स्थापित करण्यात आलेली आहेत. त्या सेंटर्स चा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राऊंड-१चे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवारदि.२० जुलै २०२३ पासून ते शनिवार दि. २२ जुलै२०२३ पर्यंत   चालणार आहे. स्वेरी अभियांत्रिकीचा इन्स्टिट्यूट चॉईस कोड इ. एन.-६२२० हा आहे. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सांगोला (आर.बी.पवार-९६६५२२७५८५व्ही.एम.साळे- ९१७५७९९४८०)बार्शी (पी.बी.भागानगरे- ९७६६२२३५२२एस.एस.गायकवाड -८९७२८०००७८)कुर्डुवाडी (एस.सी.हलकुडे- ९८५०२४२१५५एम. एम. आवताडे- ८३२९३९०८१७)धाराशिव (ए.ए.गरड-९२८४७०६०२७एस.ए.गरड-८२०८६२०७१८)लोहारा(ए.ए.शिंदे-८६६८४१६५५९जे.एल.मुसळे– ९३५९२५०५१३)वैराग (एच. आर. पवार ८२०८४४८५९२)करमाळा (बी. टी. गडदे- ८२०८२६२११३पी.डी.माने-७०२०६०६७७९)माढा (डी.टी.काशीद – ८२०८७२४२६६ए. के पारखे-९५०३६३२६२२)टेंभुर्णी (एम.एस. सुरवसे-८८०६६६०५३७एस.डी.इंदलकर-९६६५६४०६४२)मंगळवेढा (पी.बी.आसबे७८२१००४६४७के.एस.पुकाळे -७७७६०७०९१३)अकलूज (सी.सी.जाधव– ८३०८६८९५७०वाय. बी. सुरवसे- ८६००८५५०२३)अक्कलकोट (जे. के. कोष्टी-९५८८४९२१२०एस.डी.कोल्हे- ९७६७१३२८४८)जत (एस. एम. शिंदे-९४०३७५१०३९एच.एच. मल्लाड- ९९७५६२३८७५)महूद (व्ही.ए.सावंत-७७०९३२२०७३व्ही.व्ही.राजमाने- ९०६७२८७७६७)करकंब (एस. जी. जाधव-९७६४३५४८०९एस. एम. काळे-९९६०११८५८०)मोहोळ (आर. एस. साठे– ७७०९९४१४८२पी. पी. चव्हाण -८४४६४०४६०९)आटपाडी (ए.बी. कोकरे– ९७६६१२९१६९)उ. सोलापूर (ए. एस.ढवळे -८३८००५०५६०)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने तसेच अभियांत्रिकीला सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर या पहिल्या कॅप राउंडला देखील नेहमीप्रमाणे विक्रमी गर्दी होणारहे निश्चित.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago