ताज्याघडामोडी

आधार-पॅन लिंकिंगवर नवीन अपडेट! NRI, OCI साठी आयकर विभागाने जारी केल्या नवीन सूचना

आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक एकमेकांशी संलग्न केले नाही तर पॅन क्रमांक उपयोगात आणता येणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार ३० जूननंतर पॅन क्रमांक रद्द होणार असे वृत्त अनेक माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने विस्तृत ट्विट केले आहे. यामध्ये अकार्यरत झालेले पॅन रद्दबातल झालेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पॅन क्रमांक अकार्यरत झाला तरीही संबंधित व्यक्ती जर करदाता असेल तर तिला प्राप्तिकर विवरणपत्र भरता येईल, याकडेही प्राप्तिकर विभागाने लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशस्थ यांच्या पॅन क्रमांकांबाबतचे गैरसमजही विभागाने या ट्विटद्वारे दूर केले आहेत.

मागील तीन करनिर्धारण वर्षांत प्राप्तिकर विवरण भरणाऱ्या अनिवासी भारतीयांना प्राप्तिकर विभागाने निवासी दर्जा दिला आहे. याविषयी संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याला (जेएओ) माहिती दिली गेली आहे. या करदात्यांचा पॅन क्रमांक संलग्नतेअभावी अकार्यरत झाला आहे. ज्या अनिवासी भारतीयांचे पॅन अकार्यरत झाले आहेत त्यांनी त्याच्या निवासी दर्जाविषयीची माहिती संबंधित अधिकारक्षेत्रीय निर्धारण अधिकाऱ्याला द्यावी. या अधिकाऱ्यांचा तपशील https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago