ताज्याघडामोडी

“मला माझ्या प्रियकराची भेट घडवा…”; महिलेचा टॉवरवर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा

शिवपुरी – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील मगरोनी पोलिस स्टेशन अंतर्गत एक अतिशय नाट्यमय प्रकरण समोर आले आहे. येथे पानघाटा गावातील एका विवाहितेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. यावेळी महिलेने सुमारे 3 तास गोंधळ घातला.

मोठ्या कष्टाने पोलिसांनी तिला खाली आणले. मात्र, महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा आणि खबरदारीच्या दृष्टीने अनेक बंदोबस्त ठेवावा लागला. 9 सदस्यांच्या टीमने 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेला टॉवरवरून खाली उतरवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरोणी चौकीतील पानघंटा गावातील एका विवाहितेने गावातील पॉवर हाऊसच्या टॉवरवर चढून प्रियकराशी पुन्हा भेट घडवून आणण्याची मागणी केली. जर तिच्या प्रियकराला बोलावले नाही तर ती टॉवरवरून खाली येणार नाही. यावेळी पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समजूतीनंतरही महिला ठाम होती.

महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने एसडीआरएफ टीमला पाचारण करावे लागले. ती खाली उतरली तर तिच्या प्रियकराला बोलावले जाईल, असे आश्वासन महिलेला देण्यात आले. या आश्वासनानंतर महिला टॉवरवरून खाली आली. साडेतीन तासांहून अधिक काळ ती महिला टॉवरवर चढून राहिली आणि यादरम्यान खाली असलेले सर्वजण काळजीत पडले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago