पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या मयुरेश अगाशे, बबन भिसे आणि माधवी शेंडे या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
” ४ डायमेन्शन इन्फोटेक” कंपनी मेकॅनिकल साॅफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंट सोल्युशन्स कॅडकॅम सीएई ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेवा प्रदान करत असुन हि कंपनी २०१२ साली पुणे येथे स्थापन झाली आहे. अल्पावधीतच या कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले श्रीपुर (ता.माळशिरस) येथील कुमार मयुरेश मोहन आगाशे, मांजरी (ता. सांगोला) येथील बबन शिवाजी भिसे आणि सातारा येथील माधवी उत्तम शेंडे या तीन विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन “४ डायमेन्शन इन्फोटेक” कंपनीत निवड झाली असून कंपनीकडून २.४० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
“४ डायमेन्शन इन्फोटेक” कंपनीत निवड झाल्यालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…