पती-पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. स्वतःही विहिरीत उडी मारून पत्नीला बुडविले आणि त्यानंतर स्वतः बुडाला. दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत बडून पती-पत्नी, असे दोघे मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. या घटनेमध्ये सिद्धाराम सुभाष कारंडे (वय-२८) आणि सोनाली सिद्धाराम कारंडे (वय २५, रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) हे पती-पत्नी मृत्यूमुखी पडले आहेत.
लक्ष्मण बाबू आलदर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस ठाण्यात फिर्यादीत झालेल्या नोंदीनुसार सिद्धाराम कारंडे याने पत्नी सोनाली कारंडेला विहिरीत ढकलून दिले. जेव्हा सोनाली जीव वाचवण्यासाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. पण, पती सिद्धाराम याने स्वतः विहिरीत उडी मारून तिला बुडविले आणि मग तो स्वतःही बुडाला. या घटनेने सांगोला तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराशेजारी त्यांच्या मेहुण्याचा मुलगा सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली आणि त्याची आजीसह राहत होता. सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. १३ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोनाली कारंडे ही त्यांच्या शेतात गेलेली दिसली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून सिद्धाराम हाही गेला. त्यावेळेस सिद्धराम कारंडे हा दारू पिऊन फुल्ल नशेत होता. पती – पत्नीमध्ये वाद चालू होता. थोड्या वेळाने फिर्यादी लक्ष्मण आलदर हे देखील त्यांच्या पाठीमागे गेले. सिद्धाराम हा सोनाली हिला शेतातील विहिरी जवळच मारहाण करत होता.
पती-पत्नीचा वाद टोकाला गेले, सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. फिर्यादी लक्ष्मण आलदर हा पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सोनाली या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले.
पती-पत्नीचा वाद टोकाला गेले, सिद्धाराम याने त्याची पत्नी सोनालीला विहिरीत ढकलून दिले. फिर्यादी लक्ष्मण आलदर हा पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सोनाली या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…