एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार असो, किंवा दर्शना पवार हत्याकांड. यासारख्या घटना पुणे शहरात ताज्या असताना एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला मारहाण करून तिचे डोके फोडल्याचे समोर आले आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात घडली.
‘तू मला भेटत का नाहीस?’ अशी विचारणा करून तरुणाने तरुणीला दांडक्याने मारहाण केली. ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू शकते’ असं उत्तर तरुणीने दिल्याने त्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी खराडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या ३७ वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के फिर्यादी तरुणीचा मित्र आहे. मागील काही दिवसांपासून तरुणी संकेतशी बोलत नव्हती. त्याच रागातून संकेतने तिला बुधवारी सायंकाळी बर्निंग घाट परिसरात गाठले. ‘तू माझ्याशी बोलत आणि भेटत का नाहीस,’ अशी विचारणा त्याने केली. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतेस. तू माझी झाली नाहीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली. ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही,’ असे तरुणीने त्याला सुनावले.
या कारणावरून दोघांत वाद झाला. चिडलेल्या तरुणाने तरुणीला शिवीगाळ केली. आरोपीने तिला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हातावर आणि पायावर वार केल्याने तरुणी खाली पडली. त्यानंतरही आरोपीचे क्रौर्य कमी झाले नाही. त्याने निर्दयीपणे तरुणीच्या डोक्यात दांडक्याने वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचे डोके फुटल्याने ती गंभीर जखमी झाली. तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिस उपनिरीक्षक महेश वराळ तपास करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…