ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या चार विद्यार्थ्यांची निवड

कर्मयोगीचे प्लेसमेंट मधील सातत्य कायम.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षा मधील चार विद्यार्थ्यांची मेटा इंगिटेक या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक 3.36 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

पुणे येथील मेटा इंगिटेक या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या अजित शिंदे, आनंद साळुंखे, विकास पवार, आकाश शिंदे या विद्यार्थ्याची निवड केली आहे. दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले सातत्य कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून सांगतात. शेवटच्या वर्षामध्ये असताना च विद्यार्थ्यांना गलेल्लठ पगाराची नोकरी मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक यांनी गणेश मोरेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

7 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

7 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago