बहुतांश भागात १ ते ६ जुलै दरम्यान समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, विदर्भाचा पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढील २ ते ३ दिवसांत घाट क्षेत्रातही मध्यम पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लवासा येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लोणावळा येथे ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे ३८ मिमी पाऊस झाला आहे. रायगडमधील पेण येथे १२६ मिमी, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे ९० मिमी, सिंधुदुर्गमधील दोडामार्ग येथे १०७ मिमी, रत्नागिरीतील खेड येथे १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरीसह रायगड आणि पालघर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ कायम करण्यात आला आहे तर ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने आणि पश्चिम किनार्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रीय असल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…