पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात पोहोचलेल्या पत्नीला धक्काच बसला. पत्नी पतीला सरप्राईज देण्यासाठी पोहोचला. मात्र तिथे तो त्याच्या प्रेयसीसोबत मजा करत होता. आपला विश्वासघात झाल्याच्या धक्क्यानं महिला कोलमडली. तिनं संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर रडत रडत तिनं रेल्वे स्टेशन गाठलं. आपल्या दोन मुलांसह रेल्वे रुळांवर उडी घेत तिनं जीवनप्रवास संपवला.
मूळचा मथानियाचा रहिवासी असलेला सुरेश बिश्नोई जोधपूरमध्ये टॅक्सी चालवतो. शहरातील रातानाडामध्ये एका भाड्याच्या घरात तो राहतो. २ जुलैला त्याचा वाढदिवस होता. मथानिया गावात राहणारी त्याची पत्नी बिरमा देवी त्याला सरप्राईज देण्यासाठी शहरात येण्यास निघाली. तिच्यासोबत तिची दोन लहान मुलंदेखील होती. रविवारी सकाळी ८ वाजता बिरमा देवी रातानाडामध्ये पतीच्या घरी पोहोचली. तेव्हा तिथे सुरेश दुसऱ्याच महिलेसोबत वाढदिवस साजरा करत होता. त्याला पाहून बिरमा देवी संतापली. तिनं सुरेशला सुनावलं. पतीनं विश्वासघात केल्यानं बिरमा देवीला धक्का बसला. आपल्या दोन्ही मुलांना (कार्तिक आणि विशाल) घेऊन ती मथानियाला जाण्यासाठी बसमध्ये बसली.
बिरमानं बस मध्येच थांबवली. ती मुलांसह मंडलनाथ रेल्वे स्थानकाजवळ उतरली आणि रेल्वे रुळांच्या दिशेनं निघाली. ट्रेनसोर उडी घेत तिनं मुलांसह आयुष्य संपवलं. बिरमा देवीनं रात्रीदेखील पतीला फोन केला होता. तिला पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र त्यानं कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ती सकाळी लवकर मुलांना घेऊन पतीला भेटण्यासाठी निघाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरेश बिश्नोईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सुरेश आणि त्याच्या प्रेयसीला अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…