उत्तरप्रदेश राज्यातील महिला पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या या सध्या सोशल माडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या पतीची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका महिलेला नोकरी मिळाल्यानंतर ती तिच्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना झारखंड राज्यातील असून कल्पना असे या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाई पंडित यांचा विवाह 14 वर्षांपूर्वी कल्पना देवीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. अशिक्षित पतीने पत्नीला जमशेदपूरमध्ये ठेवले आणि तिला एएनएमचा अभ्यास करून दिला.
अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कल्पनाला नोकरीही लागली, पण नोकरी मिळताच ती एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. पतीने केला हा आरोप – कल्पना या महिलेचा पती कन्हाई याने आरोप केला आहे की, पत्नीला शिकवण्यासाठी पैसे काढल्याने त्या कर्जामुळे तो पैसे कमाईसाठी गुजरातला गेला होता. मात्र, परत आल्यावर त्याला बायकोची वागणूक फारशी चांगली वाटली नाही. तिचे पतीसोबत भांडण झाले आणि नंतर ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली.
यानंतर पतीने पत्नीच्या शोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला, पण तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. गुरुवारी त्याला एसडीपीओ कार्यालयातून फोन आला की त्याने सर्व माहिती घेऊन कार्यालय गाठावे. कार्यालयात पोहोचल्यावर एसडीपीओने प्राथमिक चौकशी केली. यानंतर गावातील काही साक्षीदारांसह त्याला पुन्हा कार्यालयात येण्यास सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…