बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेड अलर्ट, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.
मुंबईजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आज मुंबई, ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई आणि मुळशी येथे जोरदार पाऊस पडणार असून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ओलांडताना खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…