ताज्याघडामोडी

मुलीच्या आईचा लग्नाला विरोध; तरुणाने प्रेयसिला कॉल्डड्रींकमधून दिलं विष अन्..

काही दिवसांपूर्वी पुण्यात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने आपलीच मैत्रीण दर्शना पवार हिची हत्या केली होती. दर्शना नुकतीच एमपीएससी परीक्षेत राज्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. यानंतर पुण्यातच एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. सुदैवाने ती यातून बचावली. या घटना ताज्या असतानाच नांदेडमधून एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार दिल्याने युवकाने तरुणीला विष पाजून तिचा खून केला. या कृत्यानंतर विष पिऊन स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

भोपाळवाडी गावातील 23 वर्षीय तरुणी सुप्रिया जाधव हिचे याच गावातील रोहिदास जाधव या 25 वर्षीय तरुणासोबत प्रेम संबध होते. एका रात्री दोघांना मुलीच्या आईने एकत्र पाहिले. नंतर मुलाने लग्नाची मागणी घातली. पण मुलीच्या आईने नकार दिला. दरम्यान याच रागातून रोहिदास जाधव याने स्प्राईट या सॉफ्ट ड्रिंकमधून मुलीला विष पाजले. नंतर स्वतः त्याने विष घेतले. यात मुलीचा मृत्यू झाला तर युवकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्माननगर पोलिसांनी युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

नांदेड शहरातील हनुमानगड परिसरात रात्रीच्या वेळी हल्लेखोरांनी हैदोस घालून घरासमोर उभ्या केलेल्या 20 ते 25 चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या 3 हल्लेखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या. ही घटना येथील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेबाबत तीन संशयितांना विमानतळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

21 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago