देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. हत्या, आत्महत्या तसेच खुनाच्या घटनाही समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात रेल्वे रुळावर एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धनराज असे मृताचे नाव आहे. गावातीलच अशोक यादव याने धनराज याचा 20 रुपयांच्या वादातून खून केला, असा आरोप धनराजच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटना शिवरामपूर चौकी परिसरातील तराव गावची आहे. येथे धनराज नावाचा तरुण गावातच चाट विकायचा. 5 दिवसांपूर्वी अशोक यादव नावाच्या तरुणाने धनराजकडून 20 रुपयांची चाट उधार खाल्ली होती. त्यामुळे परवा धनराजने त्याच्याकडे 20 रुपये उसने मागितले असता अशोक यादवने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत मजल गेली. त्यानंतरच लोकांनी मध्यस्थी करून दोघांची सुटका केली. यादरम्यान अशोक यादव याने धनराजला बघून घेण्याची धमकीही दिली होती.
सायंकाळी उशिरा धनराज चाट स्टॉल बंद करून घरी गेला. धनराज दुसऱ्या दिवशीच्या खरेदीसाठी चाटसाठी लागणारा सामान घेण्यासाठी बाहेर पडला. पण पुन्हा तो घरी पोहोचलाच नाही. रात्री नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. पण तो मिळून आला नाही. दुसरीकडे, जीआरपी पोलिसांनी धनराजचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला काढून शिवरामपूर चौकी पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर धनराजचा खून झाल्याचे समोर आले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…