ताज्याघडामोडी

कर्मयोगीच्या इंस्टीट्यूटच्या तब्बल दहा विद्यार्थ्यांची कोड माइंड टेक्नोलॉजी मध्ये निवड

“कर्मयोगी पॅटर्न” चा विद्यार्थ्यांना मोठा फायदा.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील तब्बल दहा विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कोड माइंड टेक्नोलॉजी या प्रशिक्षण देणर्‍या संस्थेमध्ये निवड झाली आहे. कोड माइंड टेक्नोलॉजी ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी नामांकित कंपनी असून त्याद्वारे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील निकिता शिरसाळे, अक्षता देशमुख, प्रतीक निचळ, नागेश जमखंडी यांची निवड करण्यात आली तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील वैभवी वडीतले, सारिका पारेकर, रोहित देशमुख, भाग्यश्री पोतदार, वर्षा निंबाळकर, शिवानी पारिट या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

कर्मयोगीमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षा पासून च दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याधीच नोकरी मिळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा मोहसिन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

9 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago