सांगली जिल्ह्यात ऑनर किंलीगची घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणास वडिलांनी विरोध करत निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये शनिवारी घडली.प्रेमप्रकरणास वडिलांचा असलेला विरोध आणि मुलगी सांगूनही ऐकत नाही, म्हणून चिडून वडिलांनीच खून केला. श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मयत मुलीचे नाव आहे. संतोष जगन्नाथ जाधव, असे श्रेयाच्या वडिलांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. त्यामुळे 1 जुलै रोजी शनिवारी श्रेया कॉलेजला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र, वडिलांनी तिला संबंधित मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. यावरून वाद झाल्यानंतर वडिल संतोष यांनी रागाच्या भरात समोर असणारा भाजी चिरण्याचा चाकू घेऊन श्रेयावर हल्ला केला.
वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी मृत श्रेयाचे वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…