अहमदनगरहून बँकिंगचा पेपर देऊन वसतिगृहात परतलेल्या २२ वर्षीय सौरभ सुरेश काळबांडे या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. पदवीनंतर त्याने परीक्षेची तयारी सुरू केली होती.परंतु, स्पर्धेच्या तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता हॉस्टेलमधील तरुण छतावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मूळ वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीचा असलेल्या सौरभचे वडील शेती करतात, तर आई गृहिणी असून एक लहान भाऊ व मोठी बहीण आहे. बारावीपर्यंत गावाकडे शिकलेल्या सौरभने पदवीच्या शिक्षणासाठी गाव सोडले होते. गतवर्षी बी.एसस्सी. कृषी उत्तीर्ण झाल्यानंतर बँकेत अधिकारी होण्याचे ध्येय सौरभने ठरवले होते. त्यासाठी तो शहरात आला होता. क्लासेस करून अजबनगरमधील हॉस्टेलमध्ये राहत होता. २ जुलै रोजी आयडीबीआय बँकेच्या अधिकारीपदाची परीक्षा होती. त्यात त्याचे अहमदनगरला परीक्षा केंद्र होते.
सौरभच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मित्रांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ वडिलांना नेहमी कॉल करून अभ्यास, दिनक्रमाविषयी सांगायचा. रविवारी परीक्षा देऊन आल्यानंतर तो मित्रांसोबत खाणावळीत गेला. त्यानंतर तो बराच वेळ वडिलांशी बोलला. त्याच्या खोलीतील पार्टनर नंतर दुसऱ्या मित्राकडे झोपायला गेला. त्यानंतरच सौरभने मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर गळफास घेतला. सोमवारी घटनेची माहिती कळताच निरीक्षक संतोष पाटील यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अशाेक शिर्के यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटना कळताच नातेवाईक दुपारी घाटीत दाखल झाले. चुलत भाऊ, काकांनी सौरभचा मृतदेह दिसताच टाहो फोडला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…