अनैतिक संबंधातील त्रासाला कंटाळून प्रेयसीनेच प्रियकराचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडली. महिलेने प्रियकराला घरी बोलावले, मग त्याला बेदम मारहाण केली.नंतर त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात पुरला. यानंतर महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत पुढील तपास सुरु केला आहे. प्रमोद कुमार असे मयत प्रियकराचे नाव आहे. महिला आणि मयत युवक दोघेही विवाहित आहेत.
आरोपी महिलेचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला असून, तिला तीन मुलंही आहेत. महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर असतो. मयत प्रमोद कुमारचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. दोघांमध्ये चार वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. काल रात्री 1 वाजता प्रमोदकुमार महिलेच्या घरी तिला भेटायला गेला होता. यावेळई दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून महिलेने त्याची हत्या केली.
हत्येनंतर मृतदेह शेतात पुरत असताना गावातील एका व्यक्तीने पाहिले. त्या व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत आपण प्रियकराची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्रमोद खूप त्रास द्यायचा म्हणून आपण त्याला संपवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. हत्याकांडात महिलेव्यतिरिक्त 5 ते 7 जणांचा सहभाग असून, सर्व जण फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…