ताज्याघडामोडी

महिला लिव्ह इन पार्टनरसोबत लॉजवर गेली, नंतर पतीही धडकला; पण दरवाजा उघडताच सर्वजणच हादरले

अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौकात असलेल्या साईलीला या हॉटेलमध्ये आपल्या लिव्ह इन जोडीदारासोबत आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या घटनेनंतर महिलेसोबत हॉटेलमध्ये वास्तव्य असणारा जोडीदार फरार झाला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिरा रोड येथे वास्तव्यास असल्याचा पुरावा दाखवत २४ जूनपासून हे लिव्ह इन जोडपे साईलीला हॉटेलमध्ये राहत होते. मात्र शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या एका खोलीमध्ये एक महिला मृतावस्थेत आढळल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा तिचा जोडीदार मात्र एक दिवस अगोदरच हॉटेलमधून फरार झाल्याची माहिती पोलिसांना घटनास्थळी मिळाली. शहाजहान अख्तर असे या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही लग्नानंतर पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र त्यांचा पत्ता कोणालाच लागत नव्हता. अशातच अंबरनाथमधील लॉजमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच मयत महिलेचा पती आणि तिची बहीण यांना संशय आल्याने ते या लॉजवर पोहोचले. तेव्हा त्यांनी लॉजमध्ये विचारणा केली असता, लॉजच्या माहिती पुस्तकात सदर महिलेचे नाव दिसले. तेव्हा ही महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा लॉज चालक याने ठोकला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉज चालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. या लॉज चालकाने दुसऱ्या चावीने सदर रूम उघडल्यानंतर हीमहिला मृतावस्थेत पोलिसांना आढळली.

दरम्यान, पोलिसांनी तिचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सदर महिलेचा मृत्यू आजाराने झाल्याचे शवविच्छेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. मात्र, व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूबाबत आणखी स्पष्टता येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिस या महिलेच्या जोडीदाराचा शोध घेत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

9 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago