राजकोटमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी अनेक औषधांचं सेवन करुन या महिलेने मृत्यूला जवळ केलं. यापूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिण्याचा प्रयत्न केला. यानंतर नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. यामध्ये महिलेने तिच्या पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध असल्याचं नमूद केलं आहे. यानंतर महिलेने आत्महत्या केली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोटच्या लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या अलका परमार नावाच्या विवाहित महिलेने एकाच वेळी अनेक औषधं प्राशन करून आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने आपल्या मुलीचा सांभाळ करण्याची विनंती केली आणि त्यानंतर तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले. पत्नीने लिहिले की, पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध होते. माझं कोणी काही ऐकत नाही. मी जगून काय करु, इतकं लिहून या महिलेने औषधं खाल्ली. महिलेने तिच्या व्हिडिओमध्ये पती आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोपही केला आहे. तिचे हे दोन्ही व्हिडिओ फोनमध्ये सापडले आहेत.
राजकोटच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात भावाच्या तक्रारीवरून पती जैस्मिन परमार, सासरे रमेशभाई परमार, सासू सरोजबेन परमार आणि पतीची मैत्रीण पायल यांच्याविरुद्ध कलम ३०६, ४९८ (ए) आणि ११४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…