पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील एका वृद्ध दाम्पत्याने बुधवार (दि २१) रोजी आजारपणास कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर इतरांना कोणताही त्रास नको यासाठी आत्महत्या करण्यापूर्वी चितेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी एका शेतात गोळा करून ठेवले. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील वेतवडे या गावात महादेव दादु पाटील (वय-७५ ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील ( वय-७० ) राहतात. या वृद्ध दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीत दिवसभर शेतात ते राबत असत.
या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून सर्व गावकरी आदराने आणि लाडाने त्यांची गरीब व स्वाभिमानी जोडपे अशी प्रशंसा करत. सर्व गावकरी दोघांना आदराने आण्णा, द्वारकाआई असं म्हणत असत. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…