ताज्याघडामोडी

जन्मदात्या आईनेच केला बाळाचा सौदा, अनाथालयात विकलं; दुसऱ्यांदा ५ लाखांचं डील होणार तोच…

छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षांचे बाळ एका अनाथालयाला विकले. इतकंच नाहीतर तेच बाळ अनाथालय मालक व त्याची पत्नी यांनी तिसऱ्याला ५ लाख रुपयांना विकले असल्याचा धक्कादायक प्रकार भरोसा सेलमुळे उघडकीस आला आहे. शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये मुलाची आई, मामा अनाथालय चालक व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसाार, भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना शिवशंकर कॉलनीतील आश्रमातून अडीच वर्षाच्या बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तायडे यांनी तात्काळ पथक तयार केलं. घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना देत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांना पथकामध्ये घेतलं.

पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी १२ वाजता अनाथालयात धाड टाकली. यावेळी अनाथालयाचा मालक दिलीप हा समोर आला. पोलिसांनी त्याला बाजूला घेत चौकशी सुरू केली असता पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे व गात या दोघींनी अनाथालयाची झाडझडती घेतली. यावेळी अडीच वर्षाचे बाळ व अनाथालयाचा चालक याची पत्नी बाळाला झोळीत सांभाळत असल्याचं निदर्शनास झालं.

दरम्यान, या प्रकरणी अनाथालयाचा चालक दिलीप याला मुलाबाबत विचारपूस केली असता त्याने पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील सुनीता विलास साबळे नावाच्या महिलेने हे बाळ आम्हाला दत्तक दिले. महिलेने दिलेल्या दत्तक बाळाचे काही कागदपत्र आम्हाला मिळाले. मात्र, ते बाळ तिथेच आहे याचा कुठलाच पुरावा तिने दिला नाही असे देखील सांगितलं. काही वेळाने अनाथालयामध्ये प्रदीप नंदकिशोर डागा वय ४० रा. कॅनॉट प्लेस व त्याची पत्नी हे मुलाला दत्तक घेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे चौकशी करून जबाब घेतला असता त्यांनी मुलाला पाच लाख रुपयांत विकत घेतलं असल्याचा जबाब दिला आहे, यामुळे एकच खळबळ उडाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

11 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago